कंदलगाव - प्रकाश पाटील ,
गेल्या अनेक वर्षाच्या हवामान खात्याच्या अंदाजा नुसार जिल्ह्यात १५ जून नंतरच खऱ्या पावसाला सुरूवात त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत कडून नालेसफाई केली जाते . मात्र काल दि .३१ रोजी अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नाले तुडूंब भरल्याने पाणी रस्त्यावरुन वाहत होते .
दक्षिण विभागातील पाचगाव , मोरेवाडी , कंदलगाव सह आर .के. नगर परिसरातील नालेसफाई झाली नसल्याने नविन कॉलनी , मुख्य मार्गासह अनेक ठिकाणी पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहत होते . तसेच शेंडापार्क मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूचे नाले मातीने पूर्ण भरले असून पावसामुळे साईट पट्टीवरील कचरा , माती संपूर्ण परिसरात पसरली आहे .
: - सखल भागात पाणी तुंबले ...
पाचगाव ,मोरेवाडी तसेच आर .के. नगर परिसरात अनेक ठिकाणी नविन कॉलण्याचे काम सुरू असून या भागात असूनही खरमातीची भर टाकून रस्ते तयार केले आहेत . आशा ठिकाणी जमिनिची लेव्हल नसल्याने पाणी तुंबले आहे .
- डेंग्यू , मलेरियाचा प्रार्दूभाव रोखणे गरजेचे ..
सध्या कोरोना बरोबर परिसरात डेंग्यूचेही रुग्ण सापडत असून नागरीकांत भितीचे वातावरण असून संबधीत ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई , स्वच्छता करून नागरीकांना या रोगराई पासून दुर ठेवावे . अशी मागणी होत आहे .
: - एक महिन्यापूर्वी नालेसफाई केली आहे . पुन्हा कामगार व जेसीबी द्वारे सफाईचे काम सुरु आहे .
संग्राम पाटील . सरपंच, पाचगाव
- नालेसफाई पूर्ण आहे . वाढीव कॉलणीतील बांधकामामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे . दक्षता घेऊन पुन्हा सफाई सुरु केली आहे .
रामदास मोरे . प्र . सरपंच , मोरेवाडी
- कंदलगाव परिसरातील नालेसफाई सुरू आहे . दोन दिवसात सर्व बाजू पूर्ण होतील . सफाई अभावी रोगराई पसरणार नाही याची दक्षता घेऊ .
सौ . अर्चना पाटील , सरपंच कंदलगाव
फोटो - आर .के. नगर शेजारी शेंडापार्क येथे नाल्यातील पाणी तुंबले आहे .
( छायाचित्र _ प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment