Tuesday, 9 June 2020

पंतप्रधान व मुख्यमंत्री साह्यता निधीतहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या कडे सुपूर्द.धोंडूतात्या देवस्थान ने दोन लाख चौष्ठ हजार रू.दिले कोरोणा निधी.


उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे 
 मराठवाड्याचे प्रतिपंढरपुर म्हणुन ओळखले जाणारे तिर्थक्षेत्र श्री समर्थ धोंडुतात्या महाराज संस्थान डोंगरशेळकी ता.उदगीर यांच्या वतीने कोरोणा महामारी या आजाराणे थैमान घालण्यास सुरूवात केली आहे त्यामुळे संस्थान च्या वतीने ही या महामारी अजाराच्या मदतीला धावत आले आहे.
 डोंगरशेळकी हे उदगीर तालुक्यातील एकमेव तिर्थक्षेत्र संस्थान आहे येथे दर पंधरवडा एकादशी ला यात्रा भरते येथे दर्शनासाठी भावीक शेजारील तेलंगणा,कर्नाटक,आंध्र प्रदेश व पंचक्रोशीतील भावीक मोठ्या प्रमाणात येतात म्हणुन या गावाला प्रतिपंढरपुर म्हणुन ही ओळखले जाते.या संस्थानच्या वतीने  पंतप्रधान साह्यता निधीसाठी  एक लाख बारा हजार रूपये, तर मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी एक लाख एक्कावन हजार आठसे ऐकोन नव्वद रूपये, असा निधी उदगीर तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या कडे देण्यात आले यावेळी संस्थान चे विश्वस्त बाबुराव घटकार,व्यंकटरा मुंडे,मा.सरपंच चंद्रपाल शेळके,पत्रकार गणेश मुंडे,
बि.एन.मुंडे सर,अनिल चौधरी,तातेराव मुंडे. उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment