Tuesday, 9 June 2020

राज्यस्तरीय ई - पोस्टर स्पर्धेत सरोजीनी फार्मसीचा स्वप्नील लाड प्रथम ....

कंदलगाव ता .९ ,
    कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे सर्व महाविद्यालये बंद आहेत तरी या वेळेत सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, राजेंद्र नगर कोल्हापूर चे प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन उपक्रम व स्पर्धा यामध्ये सहभाग नोंदवित आहेत. 
      कॉलेजच्या तृतीय वर्षातील स्वप्नील लाड या विद्यार्थ्याने ऑनलाईन उपक्रमात सहभाग घेतला. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, नवी मुंबई यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ई- पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत त्याने सहभाग घेतला  व त्याने स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला कॉलेजचे प्राध्यापक निलेश देसाई, गौरव गाडगीळ, रोहन माने यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनिल हारेर व संस्थेच्या सचिव सौ. शोभा तावडे यांनी केले.

No comments:

Post a Comment