कंदलगाव - प्रकाश पाटील ,
शेतकऱ्याच्या जिवनात येणारा प्रत्येक दिवस कष्टाचा आणि समस्येने भरलेलाच येतो . कधी पाऊस नाही म्हणून शेती पिकत नाही तर कधी पाऊस जास्त झाल्याने पिकलेली शेती वाहून जाते . आशा चारी बाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही अपेक्षा न बाळगता आपल्या चांगल्या नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या गावातील शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी गिरगाव ता . करवीर येथील प्रगतशील शेतकरी अनिल महादेव पाटील शेती व्यवसाय करण्यास सुरुवात केली . त्यांनी त्यांच्या शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीचा कायापालट केला आहे.
शेतकरी बांधवांना शेती व्यवसाय करत असताना त्यांच्या मदतीला जाऊन कोणतीही अपेक्षा न करता देतील तो मोबदला घेऊन काम पूर्ण करणे . आशा स्वरूपाचे त्यांचे नित्याचेच काम सुरू आहे .आता सर्वत्र भात टोकणीचे दिवस चालू आहेत. त्यांनी चालू हंगामात १२५ ( एकर ) जमीन कुरीच्या माध्यमातून पेरणी पूर्ण केली आहे.
सकाळी सात पासून दिवस मावळेपर्यत ऊन , वारा यांची तमा न बाळगता अखंड काम करून शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरू आहे . आशा शेतकऱ्या बद्दल परिसरात चर्चा सुरू असून त्यांच्या विषयी समाधान व्यक्त होत आहे .
फोटो - कोणतीही अपेक्षा न करता आपल्या बांधवांसाठी सज्ज असणारा गिरगाव येथील शेतकरी अनिल पाटील
No comments:
Post a Comment