माजगाव प्रतिनिधी:
पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नारायण धनगर यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मारुती लहू आरेकर होते.
पोर्ले/ठाणे ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील (आण्णा)यांच्या कासारी ग्रामविकास आघाडीची सत्ता आहे.कासारी ग्रामविकास आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच कमल नामदेव चौगुले यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते.
उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवार दिनांक ०८/०६/२०२०रोजी सभेचे आयोजन केले होते. नारायण धनगर यांचा उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ग्रामविकास अधिकारी विजयकुमार पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.मावळते उपसरपंच कमल चौगुले यांनी उत्कृष्ट काम केले.यासाठी त्यांचाही सत्कार करणेत आला.
या सभेस माजी सरपंच प्रकाश रामराव जाधव, माजी सरपंच भाऊसो चौगुले, माजी उपसरपंच लता विजय चोपडे,अंजना चौगुले, सरस्वती चेचर, दयानंद चौगुले, छाया कुंभार, बाळाबाई मोरे,जमीला मुल्लानी आदी सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment