Tuesday, 23 June 2020

योगा केल्यामुळे मानवी शरीर निरोगी राहते - प्रा. डॉ. डी. झेड. चौधरी



 
नंदुरबार -प्रतिनिधी  -  वैभव करवंदकर     

                  येथील नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या बहिस्थ बीएड 2019-21 च्या छात्राध्यापकांसाठी योग दिनानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला यचममुवि नाशिकच्या शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा साळूखे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. झेड. चौधरी यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व नं. ता. वी. स. चे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी. एड. अभ्यासकेंद्रच्या वतीने  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. डी. झेड. चौधरी मार्गदर्शन करताना म्हणाले की, मानवी शरीरात जर रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर रोज मनुष्याने योगा केलाच पाहिजे. योगा केल्यामुळे शरीर व मन निरोगी राहते, दैनंदिन ताण तणाव कमी करता येतो, असे प्रतिपादित करून सूक्ष्म व्यायाम, ताडासन, सूर्यनमस्कार, त्रिकोणासन, धनुरासन, सर्वांगासन इत्यादी आसने त्यांनी करून दाखविली. कपालभाती, अनुलोम विलोम इत्यादी प्राणायामचे प्रकार , ध्यानाबद्दल माहिती दिली तसेच यावेळी छात्र अध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुक्त विद्यापीठ बी. एड. नंदुरबार केंद्राचे समन्वयक प्रा.मोईन शेख यांनी प्रस्तावना करतांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व सांगून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी योगा केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. मार्गदर्शन वर्गाच्या चे प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या प्रभारी संचालक डॉ. कविता साळुंखे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, योग ही एक साधना आहे. ती आम्हाला प्राचीन काळापासून ऋषीमुनीं कडून मिळालेली देणगी आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या पुढाकारानेच 21 जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन म्हणून मान्यता मिळाली आहे, असे सांगून छात्र अध्यापकांनी दिवसाची सुरुवात योगा करून करावी, असे आवाहन केले. अत्यंत सुंदररित्या पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नं. ता. वी.समितीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. एस.रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रकटन प्रा.डी. बी.पाटील यांनी केले. तर सूत्रसंचलन छात्र अध्यापक देवेंद्र बोरसे यांनी केले. सदरकार्यक्रमाला मोठ्या संख्येने छात्र अध्यापक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment