**
उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
उदगीर तालुक्यातील डांगेवाडी येथील तुकाराम पुंड यांच्या संसाराला काही दिवसापूर्वी मोठा आघात झाला होता. घरातील कर्ता माणुस गेल्याने घरात अडचणीचा डोंगर चढून बसला असतानाच वाढवणा पाटी येथील व्हाट्सएप या ग्रुपने 42 हजार रूपयाची रक्कम मदतीच्या स्वरुपात पुंड यांच्या पत्नी नागीनबाई पुंड यांच्याकडे सुपुर्द केले.नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वाढवणा पाटी व्हाट्सएप ग्रुपने अनेक सामाजिक कार्य ऋण म्हणून फेडण्याचा प्रयत्न केला आहे.
पुंड यांच्या कुटुंबाला एक प्रकारे आधार देण्याचे कार्य या ग्रुपने केल्यामुळे पंचक्रोशीतील सर्वत्र कौतुक होत आहे.
या ग्रुपमधील सदस्यांनी ज्यांना जेवढी जमेल तेवढे रक्कम ग्रुपचे अँडमिन बालाजी बामणे यांच्याकडे जमा केली.यामध्ये रक्कम सोबतच धान्य सुद्धा देण्यात आले.अन्नधान्य मध्ये ज्वारी 1क्विंटल, गहु 50 किलो,तांदूळ 50 किलो,साखर 25 किलो,तेल डब्बा 1,मुरमुरे पोते एक व इतर साहित्य घरपोच देण्यात आले. समाजाच्या दुर्लक्षित गोरगरीबाकडे या ग्रुपने नेहमी आधार म्हणून हातभार लावला आहे.यावेळी विवेक सुकणे,विजयकुमार बिरादार, भैय्या पुंड,अमोल काळे, बालाजी बिरादार,दता उपासे,ज्ञानेश्वर उपासे,व पुंड परिवार उपस्थित होता.
....................................
वाढवणा व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून समाजातील वंचित,गोरगरीब जनतेला आधार देण्याचे कार्य केले असून यापुढेही असेच चालू राहील.
बालाजी आबाराव बामणे
ग्रुप अँडमिन
No comments:
Post a Comment