Thursday, 11 June 2020

कृषी विभागामार्फत बीजप्रक्रिया प्रशिक्षण

सैनिक टाकळी( प्रतिनिधी )
सैनिक टाकळी ता. शिरोळ येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे वतीने खरीप हंगाम निमित्त सोयाबीन , भुईमूग , मूग , उडीद या पिकांचे बियाणे उगवण चाचणी घरचे घरी कसे करावे तसेच या सर्व पिकांच्या बियाणांची बीजप्रक्रिया या बाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष  प्रात्यक्षिकासह माहिती देणेत आली ..
सदर कार्यक्रमात खरीप हंगामाचे पार्श्वभूमीवर बियाणे निवड , बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी , खते घेताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करणेत आले .
तसेच ऊस , केळी पीक प्लॉट ना प्रक्षेत्र भेट देणेत आली .

सदर कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी ,तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले , सहायक गट विकास अधिकारी सुनील रुपनर , मंडळ कृषी अधिकारी निरंजन देसाई , कृषी पर्यवेक्षक प्रकाश वठारे , कृषी सहायक जयपाल बेरड यांनी मार्गदर्शन केले ..

सदर कार्यक्रमास सरपंच सौ.हर्षदा पाटील , विलास काटकर , विद्याधर पाटील, विनोद पाटील , अजित इचलकरंजे,स्वप्नील पाटील सह इतर शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment