Thursday, 11 June 2020

प्रवीण काकडे यांना विधान परिषदेसाठी संधी द्या : ऑल इंडिया धनगर महासंघाची मागणी

गांधीनगर प्रतिनिधी,
एस एम वाघमोडे
ता. ११

स्वातंत्र्यानंतर अजूनही विकासापासून वंचित असलेल्या धनगर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या
“ ऑल इंडिया धनगर समाज महासंघा” चे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदे साठी संधी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय धनगर समाजाच्या वतीने पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचेकडे करण्यात आली. डोंगरदऱ्यात, दुर्गम वाड्यावस्ती वरती राहणारे व रानोमाळी भटकंती करत फिरणाऱ्या व अज्ञान आणि दारिद्र्याचे चटके अनेक वर्षे झेलणाऱ्या समाजासाठी सुस्वभावी प्रवीण काकडे यांचे कार्य मोठे असून अतिशय दुर्गम भागात जाऊन निस्वार्थीपणे त्यांनी या समाजाचे उत्कृष्ट संघटन तयार केले असून समाजाच्या उत्कर्षासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी संधी दिल्यास त्यांच्याद्वारे विकासापासून वर्षानुवर्षे वंचित असलेल्या धनगर समाजासाठी विकासाची कवाडे सहजगत्या उघडी होण्यास मदत होणार आहे. अनेक शाखा आणि पोटशाखा यामुळे विभागलेल्या धनगर समाजाला " धनगर सारा एक" असा नारा देत त्यांनी एकत्र आणले आहे. त्यांची सर्जनशीलता, सचोटी, वक्तृत्वता , संघटन कौशल्य ,दीनदुबळ्यांच्या प्रती असणारी आत्मीयता ,  व वंचित घटकांच्या प्रश्नांचा असलेला गाढा अभ्यास राज्यातील भटक्या विमुक्त जातींच्या प्रश्नांना सभाग्रहात वाचा फोडण्यासाठी अभ्यासू नेत्याची या सभागृहाला गरज असून या गोष्टीचा विचार करून प्रवीण काकडे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवडीसाठी शिफारस करण्यात यावी अशी मागणी समाजातून जोर धरत आहे.
'ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली' ही संघटना भारतातील सर्वात मोठी धनगर संघटना असून या संघटनेचे कार्य आज रोजी संपूर्ण भारतभर सुरु आहे. भारतातील ही एकमेव संघटना आहे की या सघटनेत कोणताही शाखा भेद न पाळता देशातील ज्या काही पोट जाती आहेत त्या सर्व कुठलाही भेदभाव न पाळता लाखो समाज बांधव “धनगर सारा एक” या एकाच झेंड्याखाली  येऊन ऑल इंडिया धनगर समाज महासंघात काम करत आहेत.
“ऑल इंडिया धनगर समाज महासंघा” चे प्रदेशाध्यक्ष प्रविणजी काकडे यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील सर्व पोट जातीतील धनगर समाज बांधवाना एकत्र आणून राज्यात धनगर समाज एकत्र करण्याचे निस्वार्थी भावनेने काम केले आहे . तरी प्रवीण काकडे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नेमणूक की संदर्भात शिफारस करावी असे निवेदन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. शंकर पुजारी यांनी दिले आहे. यावेळी  जिल्हा संपर्क प्रमूख  प्रा. मंगेश हजारे , काशिनाथ पुजारी , नेमिनाथ पुजारी , अजय हराळे , अनिल हजारे  व धनगर समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment