रजनिकांत वानखडे
वाशिम प्रतिनिधी
निमजगा, वाशिम येथील एकाच कुटुंबातील ६० व ६५ वर्षीय दोन महिला तसेच ४० वर्षीय पुरुष अशा एकूण तीन व्यक्तींचे #कोरोना विषयक अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. या तिन्ही व्यक्ती बोराळा हिस्से येथील कोरोना बाधित युवतीच्या संपर्कात झाल्या होत्या. तसेच बोराळा हिस्से येथील एका व्यक्तीचाही अहवाल आज ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. सदर व्यक्ती बोराळा हिस्से येथील कोरोना बाधित युवकाच्या संपर्कात आला होता.
शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) येथील एका ४८ वर्षीय महिलेचा अहवालही आज ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. रेड झोन असलेल्या पालघर जिल्ह्यातून आल्यामुळे सदर महिलेच्या कुटुंबातील तीन व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. उर्वरित दोघांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
शेमलाई (ता. कारंजा) येथील २० वर्षीय गरोदर महिलेला सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सर्व कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यासह पुढील आवश्यक कार्यवाहीस प्रशासनाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे.
No comments:
Post a Comment