उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
उदगीर तालूक्यातील भारतीय जनता पार्टीचा आश्वासक युवा चेहरा म्हणून परिचित असलेले उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास बेंबडे यांची लातूर भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
रामदास बेंबडे यांच्या निवडीने तालूक्यातील युवा वर्गात उत्साह संचारला असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. उदगीर तालूक्यातील युवा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी बेंबडे यांना नियूक्ती देण्यात आली असून भविष्यात युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. यावेळी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर श्रुंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेशआप्पा कराड, जि.प. अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे, जि.प.सदस्य रामभाऊ तिरुके, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले यांच्या उपस्थिती होती. सदरिल बैठकित पंचायत समिती उदगीरचे माजी उपसभापती रामदास बेंबडे यांना युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देत त्यांना सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment