Friday, 12 June 2020

अखेर कडक लॉकडाऊची अफवाच


कोल्हापूर प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता काही वृत्त वाहिन्यांनी लॉकडाऊन कडक होण्याची शक्यता वर्तवली होती. त्याला अनुसरून सोशल मिडियावर कोल्हापूरात सोमवारपासून कडक लॉकडाऊन होणार. सर्व व्यवहार बंद होणार अशा अफवा पसरल्या होत्या.. यामुळे नागरिकांमधून संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण पसरले होते. 

याबद्धल अधिक माहिती घेतली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे निर्देश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाने लाॅकडाऊन संदर्भात जे निर्णय घेतले आहेत त्याचीच अंमलबजावणी सुरू आहे व नवीन काही बदल झाल्यास वेळोवेळी अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे तरी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच लॉकडाऊन कडक होण्याच्या अफवा पसरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
     दरम्यान लॉकडाऊन जरी कडक होणार नसले तरी नागरिकांनी मात्र काळजी घेणे आवश्यक आहे कारण येथून पुढे कम्युनिटी स्प्रेड धोका वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. यामुळे सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे हाच एकमेव उपाय राहणार आहे.

No comments:

Post a Comment