Monday, 15 June 2020

शिक्षक सेना पदाधिकारी निवडी संपन्न

*इचलकरंजी-- 

शिवसेनाप्रणित शिक्षकसेनेच्या नव्याने नियुक्त केलेल्या शिक्षक सेना हातकणगंले तालुकाप्रमुख श्री. गजानन लवटे, इंचलकरंजी शहरप्रमुख जिनेश पुरंवत,कार्याध्यक्ष राहुल रजपूत यांचा भगवा फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे  ,शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख अरुण मुजूमदार , उपजिल्हाप्रमुख महादेराव गौड ,नगरसेवक रविंद्रजी माने यांच्या शुभहस्ते शिवसेना शहर कार्यालय येथे आज सकाळी ११ वा करण्यात आला .

शिक्षक सेना शिक्षकांच्या प्रश्नासाठी जो लढा उभा करत आहे , त्या प्रत्येक लढयात शिवसेना पदाधिकारी , शिवसैनिक हा शिक्षक सैनिक सोबत त्याच्या बरोबर उभा असेल असे मत उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे ,  शहर अध्यक्ष सयाजीराव चव्हाण यांनी आपले मत मांडले , शिक्षक सेनेस मार्गदर्शन  शुभेच्छा ,पाठिंबा बांधकाम  सभापती  भाऊसो आवळे यांनी दिल्या , 
शिक्षक सेना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास सदैव तयार आहे , शिक्षक सेना प्रांताध्यक्ष मा . ज . मो .अभ्यंकर  ( राज्य मंत्री दर्जा ) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राज्यात शिक्षक सेना कार्यरत आहे , शिक्षकांच्या जाचक अटी विरुध्द शिक्षक सेनेने  वेळोवेळी मंत्रायलयात आवाज उठवला आहे असे मत शिक्षक सेना कोल्हापुर जिल्हाप्रमुख अरुण मुजुमदार यांनी मांडले , शिक्षक सेना जिल्हा कार्यअध्यक्ष दिपक शेटे यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले,

जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, नवनियुक्त शिक्षक सेना पदाधिकारी यांनी शिक्षकांच्या हक्क मिळवुन देण्यासाठी सदैव तयार आहोत अशी ग्वाही आपल्या मनोगत मध्ये दिली .  ,
या कार्यक्रमावेळी   बांधकाम सभापती भाऊसो  आवळे,विजय जोशी,उपशरप्रमुख राजू मोकाशी ,संतोष गौड,भारत शिवलिंगे,शिक्षकसेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक शेटे,सरचिटणीस - सचिन कांबळे ,जिल्हाउपाध्यक्ष सतिश लोहार, जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप यादव , उपमुख्याध्यापक देवेंद्र कांबळे सर  ,सचिव स्वप्निल पाटील, जिल्हा कमिटी सदस्य चंद्रकांत कोळेकर, शिरोळ तालुका उपाध्यक्ष अरुण भगत , कामगार सेना अध्यक्ष सचिन खोंद्रे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 जिल्हा स.सरचिटणीस सचिन कांबळे यांनी कार्यक्रमाचे आभार मांडले .

No comments:

Post a Comment