नंदुरबार - प्रतिनिधी वैभव करवंदकर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊनमध्ये नंदुरबार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे श्रीसंत गजानन महाराज मंदिर परिसरातील सभागृहात साध्या पद्धतीने वधू-वरांचा शुभमंगल विवाह पार पडला. कोरोनाच्या या महामारीत यंदाच्या वर्षातील सर्वच विवाह सोहळे अडकले. या संकटावर मात करीत वधू-वर पक्षाने तातडीने निर्णय घेऊन मोजक्या लोकांमध्ये विवाहांना प्राधान्य दिले आहे . नंदुरबार येथील मधुकर गंगाराम जोमीवाळे यांचा चिरंजीव अक्षय याचा शुभविवाह धुळे येथील अनिल बाळाआप्पा गठरी यांची सुकन्या चि. सौ. का. वैष्णवी हिचेशी झाला. याप्रसंगी गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष व संपादक महादूआप्पा हिरणवाळे यांच्या हस्ते वधू-वरांना वृक्ष भेट देऊन वृक्षसंवर्धन करण्याबाबत सांगण्यात आले. तसेच महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल भटू लगडे (वावद ) यांच्या हस्ते वधूवरांना समाज क्रांतिकारक , जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी वधुवरांना शुभेच्छा देतांना महादू हिरणवाळे यांनी सांगितले की,कोरोनारूपी राक्षसाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असून शासनाच्या नियमांचे पालन करावे. नंदुरबार जिल्ह्यात गवळी समाजात आजचा तिसरा विवाह होत असून यापूर्वी मे महिन्यात हुच्चे - लगडे तसेच गोडळकर- हुच्चे परिवारातील वधू-वरांचे दोन लग्न साध्या पद्धतीने संपन्न झाले . हौसेला मुरड घालून खर्चिक बाबींना तिलांजली देऊन साध्या पद्धतीने विवाह समारंभ करण्यासाठी गवळी समाज बांधवांनी अनुकरण करण्याचे आवाहन नंद गवळी राजाचे संपादक महादूआप्पा हिरणवाळे यांनी केले. या विवाह सोहळ्यास धुळे येथील सिद्धेश्वर ग्रुपचे स्वयंसेवक सुनिल गठरी, शरद गठरी, माणिकराव गठरी,सुरेश गठरी,मोहन गठरी,आनंद गठरी ,लळींग येथील ठाकूर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते संतोष बागुल, नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी हिरणवाळे, संजय जोमीवाळे,शंकर यादबोले , लक्ष्मण यादबोले, प्रकाश घुगरे, ,भगवान नागापुरे, हेंमत नागापुरे, औरंगाबादचे आनंद विभुतेआदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment