Tuesday, 16 June 2020

पट्टणकोडोलीतील युवकाचा आदर्श उपक्रम - एक मित्र एक वृक्ष

पट्टणकोडोली : ( साईनाथ आवटे) 
पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील निलेश शिंदे  या युवकांने आपल्या चिरंजीवांच्या द्वितिय  वाढदिवसाच्या  निमित्ताने हुपरी रोडवरील स्मशानभूमीत  येथे एक मित्र एक वृक्ष हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. 
कोणतीही शासकीय मदत न घेता त्यांनी राबवलेल्या या संकल्पनेचे गावातील नागरीकांनी कौतुक केले. आज वाढदिवसाच्या निमित्ताने पन्नास वेगवेगळ्या प्रकाराची झाडे लावली सदर कार्यात त्यांना सर्पमित्र खोत यांनी अनमोल मदत केली.सद्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वत्र हार तुरे बुके केक याच्या वर भरपूर पैसे खर्च केला जातो विनाकारण होणारा खर्च थांबवून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे अनुकरण इतरांनी करावे असे मराठा समाजाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात मसुरकर, रवि आडके, पोपट कांबळे, लक्ष्मण पुजारी, शिरीष आवटे, नितीन पोतदार, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment