शहादा - प्रतिनिधी - वैभव करवंदकर
येथील वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभाग व कबचौ उमवि, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० जुन रोजी सकाळी १०.०० वा. एक दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. “इथीकल अँन्ड कॉलिटी अस्पेक्ट्स इन नॅनोसायन्स अँन्ड नॅनोटेक्नॉलॉजी रिसर्च” हा परिषदेचा मध्यवर्ती विषय होता. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन कबचौ उमवि, जळगाव चे प्रो. कुलगुरू मा.पी. पी. माहुलीकर यांच्या हस्ते झाले. या परिषदेस शुभेच्छा देत ते आपल्या उद्घाटनपर वक्तव्यात म्हणाले की आज साऱ्या जगाला कोरोना विषाणूचा विळखा पडला आहे. देशाचे कणखर नेतृत्व त्यावर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे. या संसर्गजन्य विषाणूपासून बचावाचा एक भाग म्हणून सर्वत्र टाळेबंदी आहे. असे म्हणत कोविड १९ च्या या काळात प्रधापकांनी आपले शैक्षणिक कौशल्य वाढवून, मिळवलेले ज्ञान विद्याथापर्यंत पोहचवावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मा.डॉ.एस. एम. देशपांडे, सह. सहसंचालक, जळगाव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे ऑनलाइन उपस्थित राहून परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत देशातील व विदेशातील अनेक विषय तद्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यात प्रारंभी प्रथम सत्रात बीओएस चेअरमन व सीएडीपी, स्कुल ऑफ फिजिकल सायन्सेसचे संचालक प्रोफेसर डॉ. एस.टी. बेंद्रे हे “मटेरिअल्स अस्पेक्ट्स फॉर ग्रीन एनर्जी इश्यु: अवर सीएडीपी इनिशिएटिव्ह” या विषयावर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. याच मालिकेतील दुसऱ्या सत्रात ऍडव्हान्स मटेरियल सायन्स आणि इंजीनियरिंग, सुन्ग्क्युन्क्वान यूनिवर्सिटी, सुवोन, साऊथ कोरिया येथील शास्त्रज्ञ डॉ. निशाद जी. देशपांडे हे “¾ÖÖò™ü´ÖêŒÃÖ नॅनोमटेरियल्स इम्पॉर्टंट” या विषयावर मार्गदर्शन करत नॅनोटेक्नॉलॉजीचे नवनवे पदर उलगडून सांगितले. तृतीय सत्रात डीसीप्लिन ऑफ मेटालर्जी इंजिनिअरिंग आणि मटेरियल सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,इंदोर येथील डॉ. रुपेश एस. देवान हे “इथिक्स इन रिसर्च पब्लिकेशन” या विषयावर आपली अभ्यासपूर्ण मते मांडून बहुमोल मार्गदर्शन केले. चतुर्थ सत्रात डिसिप्लिन ऑफ केमिस्ट्री, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंदोर येथील डॉ. उमेश शिरसागर हे “मॉडर्न फोटो केमिस्ट्री युजिंग फोटोकॅटलिसीस: ए वे टुवर्ड्स ग्रीन ऑरगॅनिक सिंथेसिस” या विषयावरचा अत्यंत तरल मुदेसूद धावता आलेख उपस्तीतांसमोर मांडला. परिषदेच्या अंतिम टप्यातील पाचव्या सत्रात जी. डी. सी. मेमोरियल कॉलेज, बहाल ( भिवानी, हरियाणा) येथील डॉ. अरिंदम घोष हे “ नॅनो टेक्नॉलॉजी: रिव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी” या विषयावर आपली अभ्यासपूर्ण मते मांडत या विषयाला नव्याने उजाला दिला.
परिषदेच्या या सर्व कार्यप्रणालीत व्याखेते मार्गदर्शक यांच्या सोबत सहभागी प्राधापक व संशोधक विद्याथ्यानीही आपला सक्रीय सहभाग नोंदवला.यात डॉ. प्रमोदकुमार, फ्री स्टेट विद्यापिठ ब्लोएम्फ़ोन्तेइन, रेपुब्लिक ऑफ सौथ अफ्रिका , कार्तीकुमार एल., गव्हरमेंट कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोइम्बतूर , कौस्तुभकुमार शुक्ला, सालेम, तामिळनाडू अश्या देश विदेशातील अनेक प्राधापक व संशोधक विद्याथ्यानी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे आपापली मते मांडली. एकतर्फी न चालणाऱ्या या परिषदेच्या यशस्वीतेबद्यल आयोजकांचे आभार मानून अभिनंदन केले. यात एक परिक्षक समिती कार्यरत होती. यातून तीन संशोधकांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी पारितोषिक देवून यथोचित गौरव करण्यात आला.
परिषदेच्या समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सा. शि.प्र. मंडळाचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेच्या समारोपावेळी प्रा. संजय जाधव यांनी प्राधापकांना वर्क फ्रॉम होम या मंत्राआधारे संगणकीय ज्ञान वाढवत मिळालेल्या ज्ञानाचा संशोधनात व विद्याजर्नात उपयोग करण्याचे सांगितले. सोबतच त्यांनी तंत्राधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याचेही आवाहन केले. आपल्या समारोपीय भाषणात प्राचार्य डॉ. ए.एन.पाटील यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेमागील हेतू साद्य झाल्याचे समाधान व्यक्त करत तंत्र व तंत्रज्ञान हे काळाची गरज असल्याचे नमूद केले व सर्वाना आवाहन केले की प्रत्येकाने तंत्रज्ञान शिक्षणात पारंगत झाले पाहिजे.
पदार्थविज्ञान विषयाचे प्रमुख व परिषदेचे संयोजक प्रा. बी. वाय. बागुल यांनी आपल्या प्रस्यावनेत परिषदेचा विषय, त्याची निवड व उपयुक्ततेवर प्रकाश टाकत उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचयही करून दिला. परिषदेचे सुत्रसंचालन आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ. एस. एम. पाटील व प्रा. बी. वाय. बागुल यांनी तर आभार प्रकटन डॉ. आर. डी. पाटील (प्राणिशास्त्र विभाग) यांनी केले. या संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने झालेल्या परिषदेच्या तांत्रिक संचालन डॉ. आर. बी. मराठे, प्रा. एस. एस. ईशी, प्रा. आर. पी. पाटील, हिमांशू जाधव व प्राधापकेतर बंधूंनी परिश्रम घेतले. या परिषदेमुळे ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ चा उदेश ही सफल झाला.
No comments:
Post a Comment