सोयाबीन उगवले नसल्याने दुबार पेरणीचा संकट
उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे
उदगीर तालुक्यात मधील बराच भुभाग हा डोंगराळ आहे व येथील जमीन पण साधारण आहे मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकरी बांधवांनी विविध कंपनीचे बियाने खरेदी करून पेरणी केली खरी मात्र अनेक शेतकरी यांच्या पदरी निराश्या पडली आहे.पेरणी केलेल्या बियानाची योग्य प्रकारे उगवण झाली नसल्यामुळे शेतकरी यांना दुबार पेरणीचा सामणा करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांनी खाजगी कंपनीचे बियाणे पेरणीसाठी वापरले.अनेक ठिकाणी उगवले तर काही ठिकाणी उगवले नसल्याची तक्रारी तालुका कृषी कार्यालयाकडे करत आहेत.कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी बांधवांनी
घरचेच बियाणे वापरले परंतु ते सुद्धा उगवले नसल्याने शेतकरी संकाट सापडला आहे उदगीर तालुक्यातील वाढवणा,खेर्डा, एकुर्का रोड, ईस्मालपुर, उमरगा मन्ना, किनी यल्लादेवी,कल्लुर,डोंगरशेळकी,गुडसुर आदी गावामध्ये कंपनीचे सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.सोयाबीनचे बियाणे उगवले नसले तरी तुर,ज्वारी, मुग ,तिळ मात्र उगवले आहे.महामंडळाच्या सोयाबीनच्या बियाण्यात काही बियाणे खराब आहे तर काही उगवले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दुकानात न जाता घरचे वापरले आहे,ते सुद्धा उगवले नाही.त्यामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला असुन शेतकरी खाजगी सावकारी पैसे काढुन बियाणे विकत घेऊन पेरणी केली ते सुद्धा उगवले नाही म्हणून दुबार करावी लागणार आहे, त्यामुळे शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी असी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
No comments:
Post a Comment