Tuesday, 23 June 2020

दिव्यांग व्यक्तींचा विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते वाटप

**. 

उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे 

 जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन होण्यासाठी व सुदृढ व्यक्तीसोबत केलेल्या त्यांच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी सदर जोडप्याना संसारात उपयोगी मदत व्हावी या उद्देशाने दिव्यांग व्यक्ती यांच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी 9 लाभार्थ्यांना (जोडप्याना) प्रत्येकी 50 हजार रुपये या प्रमाणे रक्कम रुपये चार लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.सदर योजनेचे स्वरूप वीस हजार रुपये रोख,साडेचार हजार रुपये संसार उपयोगी साहित्यासाठी व 25 हजार रुपये बचत पत्र व कार्यक्रम व इतर खर्च असे स्वरूप आहे.सदर योजनेच्या मंजूर झालेल्या 9  लाभार्थ्यांना लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते चेक वितरण करण्यात आले,
यावेळी त्यांच्या सोबत जि.प.उपाध्यक्षा सौ. भारतबाई सोळंके,समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे,कृषी सभापती गोविंद चिलकुरे,महिला व  बालकल्याण सभापती सौ.ज्योतीताई राठोड,बांधकाम सभापती संगीता ताई घुले,जिल्हा परिषद भाजप गटनेते महेश पाटील,माधव जाधव, ज्ञानेश्वर पाटील,सौ.धनश्री अर्जुने, सुभाष तात्या पवार,जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुमित खमितकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment