Wednesday, 3 June 2020

उजळाईवाडीत महिला कोरोना रुग्ण ? ; परिसरामध्ये खळबळ ;


गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
ता. ३ 
तीन महिन्यापूर्वी चिपळूणहून कोल्हापुरात संधिवाताच्या उपचारासाठी आलेल्या एका ५४ वर्षीय महिलेचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली असून उजळाईवाडीतील श्रीराम कॉलनीमध्ये रहावयास आलेली असून ती व्यक्ती फारशी कोणाच्या संपर्कात आलेली नव्हती. परंतु तरीही या व्यक्तीस कोरोणा नेमका कोणाच्या संपर्कात आल्यामुळे झाला याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
   सदर व्यक्ती सनराइज् हॉस्पिटल येथे संधीवातावरील उपचारासाठी गेल्या २९ मे पासुन  ऍडमिट आहे. या व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी स्वॅब घेण्यात आला होता या स्वॅबचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण उजळाईवाडी परिसरामध्ये खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महिले सोबत , तिचे पती व मुलगी राहत असून या दोघांनाही संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान उजळाईवाडी मध्ये कोरोणा पेशंट सापडल्यानंतर जिल्हा प्रशासन गोकुळ शिरगाव ,पोलिस ठाणे व ग्राम समितीच्या वतीने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून पुढील तीन दिवसांसाठी गावातील सर्व  दुकाने व अत्यावश्यक सेवा ही पूर्णपणे बंद असणार आहेत.
यावेळी  झालेल्या बैठकीत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सरपंच सुवर्णा माने ,उपसरपंच प्रकाश मेटकरी,  डी जी माने ,चंद्रकांत पंडित, राजू माने , यासह  ग्राम दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment