Wednesday, 3 June 2020

कर्तव्यतत्पर लोकप्रतिनिधी - नागरिकांना दिलासा

कसबा बावडा प्रतिनिधी
कसबा बावडा येथील बिरजे पाणंद ओम गणेश कॉलनीत पहिल्याच पावसात रस्त्याची अवस्था बिकट  झाली होती. संपूर्ण गल्लीत चिखल झाला होता. नागरिकांना घरातून बाहेर ही पडता येत नव्हते. गटर चॅनल साफसफाई नसल्याने ओसंडून वाहत होते. पावसाळ्याच्या तोंडावर रोगराईला आमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली होती. 
या संदर्भात एक बातमी सुद्धा लावली होती त्याची त्वरित दखल मा.आमदार ऋतुराज पाटील यांनी घेतली व नागरिकांना दिलासा दिला. त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे पदाधिकाऱ्यांना आदेश येऊन कामाला सुरुवात केली. सर्व गटर चैनल साफ करण्यात आले. यामुळे पाण्याचा निचरा झाला. लवकरच इतरही कामे केली जाणार आहेत. 
आ. ऋतुराज पाटील यांच्या कर्तव्य तत्परतेने नागरिकांना दिलासा मिळाला यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

No comments:

Post a Comment