Monday, 8 June 2020

गिरगाव येथील डोणी झऱ्याला श्रमदानातून नवे रूप : गावकरी पाण्यासाठी एकवटले ..

कंदलगाव ता .८ ,
      गिरगाव ता .करवीर येथील रेणुका मंदिर जवळील डोणी या परीसरातील नैसर्गिक झऱ्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी  श्रमदान करून लोप पावत चाललेल्या झऱ्याच्या भोवती वाढलेली काटेरी झुडपे तोडून टाकली . व झऱ्यातील गाळ काढून झऱ्याला पूर्ववत रूप दिले . गेल्या पस्तीस वर्षापासून या परिसराची स्वच्छता झाली नसल्याने गावकऱ्यांनी श्रमदान केल्याने परिसराने मोकळा श्वास घेतला . 
    यावेळी संभाजी चव्हाण  विशाल जाधव दिपक पाटील संदीप मेढे राजेंद्र चव्हाण  माजी सैनिक अशोक गुरव रमेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment