_आयुष भारत राज्यस्तरीय झूम बैठक संपन्न_
सोलापूर :
आयुष भारत ची आज राज्यस्तरीय झूक बैठक घेण्यात आली डॉ.विश्वास फापाळे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.सुहास शेवाळे, राष्ट्रीय सचिव डॉ.किशोर बोकील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. विश्वास फापाळे, डॉ.शाहिन मुलाणी, डाॅ.नामदेव मोरे, डाॅ.विलास हुडे, डाॅ.संदिप पाटील, डाॅ.वैशाली मेश्राम, डाॅ.सारिका फापाळे, डाॅ.योगेश फापाळे, डाॅ.मानसी शिंदे, डॉ.शुभम आपरे, डॉ.कृष्णा वाघमारे, डॉ.सिद्धेश्वर काळे, डॉ.महेंद्र घोडके, डॉ.श्रीराम बालभाले, डॉ.आजिनाथ भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. विश्वास फापाळे यांनी आयुष भारत ध्येय उद्दिष्ट विषयी बोलत असताना सांगितले की आयुष भारतचे फिरते हॉस्पिटल लवकरच सुरू करणार आहे यामध्ये गोरगरीब लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी ही आम्ही प्रयत्न करत आहोत वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी ही आमची संघटनेचे काम चालू आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाइफ इन्शुरन्स पॉलिसी ही लवकरच देण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्था उभारण्याची खूप गरज आहे त्यासाठी आमचा लढा चालूच आहे. आयुष भारत संस्थेचे प्रत्येकी जिल्ह्यात एक ॲम्बुलन्स 24 तास मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. तसेच नॅचरोपॅथी, इलेक्ट्रो होमिओपॅथी, अल्टरनेटिव मेडिसिन, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, हर्बल मेडिसीन, आयुर्वेद, होमिओपॅथी, सी.एम.एस ई डी, कलर थेरपी, मॅग्नेट थेरेपी, योगा व आणखीन बरेचं थेरेपी आहेत या सर्व प्रॅक्टिशनर वरती होणारे अन्याय रोखण्यासाठी आम्ही एक कमिटी तयार केली आहे ती कमिटी पूर्ण भारत भर काम करत आहे कोणत्याही डॉक्टरांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही यासाठी आम्ही दिवस रात्र काम करत आहोत असे ही डॉ. विश्वास फापाळे बोलताना सांगत होते.
No comments:
Post a Comment