Saturday, 6 June 2020

mh9 NEWS

शिवभोजन थाळी केंद्र साठी अर्ज करण्याचे आवाहन


 कोल्हापूर, दि. 5 जिल्हा माहिती कार्यालय: 
राधानगरी तालुक्यात सुरू होत असलेल्या शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपले अर्ज तहसिलदार कार्यालय राधानगरी येथे तात्काळ सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार मीना निंबाळकर यांनी केले आहे. 
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी राधानगरी तालुक्यामध्ये शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तालुक्यातील सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी इच्छूक सक्षम असलेल्या व्यक्ती /संस्था यापैकी अर्जदाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक व्यक्ती व संस्थांनी आपले अर्ज तहसिलदार कार्यालय राधानगरी यांच्याकडे तात्काळ सादर करावेत. 

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :