Wednesday, 17 June 2020

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे वनवीक कार्यशाळा व वेबिनार संपन्न ..

कंदलगाव ता .१७  ,
   भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर येथे संगणकशास्त्र विभाग  व तोश्निवाल ( एसीएस ) कॉलेज सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व शिक्षकांसाठी एज्युकेशनल व्हिडिओ क्रिएशन या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा दि .५ जून ते १० जून या दरम्यान पार पाडली यासाठी डॉ. दत्ता सावंत, डॉ. भगवान घुटे व प्राध्यापक धनाजी पाटील यांनी प्रमुख वक्ते व ट्रेनर म्हणून मार्गदर्शन केले,या कार्यक्रमामध्ये एज्युकेशनल व्हिडिओ शुटिंग कसे करावे ते करताना येणार्‍या अडचनी व त्या दूर करण्यासाठी वापरले जाणारे विविध सॉफ़्टवेअर, त्यांचा वापर या व अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. तसेच संगणक विभागातर्फे दिनांक १२ जून रोजी विद्यार्थ्यांसाठी  इन द वर्ल्ड ऑफ आय.ओ.टी. व इंडस्ट्री ४.०या विषयावर वेबिनार घेतला. यामध्ये मुलांना आय.ओ.टी., मशीन लर्निंग व इंडस्ट्री मधील आताच्या संभाव्य करिअर संबंधी माहिती देण्यात आली. यासाठी  अजिंक्य दीक्षित, टेक्नो सोल्युशन यांचे मार्गदर्शन लाभले.
   या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या विविध  कॉलेज मधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
    कार्यशाळेचे प्रास्ताविक व आयोजन विभाग प्रमुख सौ.शगुफ्ता मुल्ला यांनी केले या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. विजय आर .घोरपडे यांनी प्रेरणा दिली व मार्गदर्शन केले ,कार्यशाळेचे नियोजन राहुल मिरजकर व  प्रमोद खराडे यांनी केले..

फोटो  - कंदलगाव भारती विद्यापिठ येथे वनविक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मान्यवर .

No comments:

Post a Comment