Tuesday, 14 July 2020

जोशाबा बहुद्देशीय संस्थेतर्फे 400 रोगप्रतिकारक गोळ्यांच्या किट वाटप

            
                           
नंदुरबार :-- प्रतिनिधी - वैभव करवंदकर        

 कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी असेनिक अल्बम: 30 ह्या गोळ्यां चे 400 किट जोशाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे वाटप करण्यात आले.
             जोषाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे माळीवाडा परिसरात 400 व्यक्तींना असेनिक अल्बम:  30  या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गोळ्यांची कीट वाटपाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी  धनंजय गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला.    रुग्णमित्र दिलीप माळी धन्वंतरी मेडिकल फाऊंडेशनचे डॉ जगदीश  गिदोडिया यांनी गोळ्या देण्यासाठी सहकार्य केले
        

   यावेळी जोशाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वासुदेव माळी ,गोरखनाथ  बावा, प्राध्या.फुला खांडेकर , माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी सावता भजनी मंडळाच्या अध्यक्ष धर्मा माळी अजित  जैन, जगन्नाथ माळी, निंबा माळी, पुंडलिक माळी, सुदाम माळी , युवराज माळी, गौरव माळी, रोहित जैन, सागर माळी, वर्षा  जैन, स्वाती माळी, सखुबाई माळी, हेमाबाई पगारे  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment