Tuesday, 14 July 2020

खेबवडे येथे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव नाही - सर्व मंडळांचा एकमुखी निर्णय

नंदगाव प्रतिनिधी :  
खेबवडे ( ता - करवीर ) येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची  इस्पूर्ली पोलिस ठाणाच्या  वतीने बैठक  घेण्यात आली . बैठकीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजनी चव्हाण व सुयोग सुभाषराव वाडकर यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे  यंदाचा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचे आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील सर्व तरूण मंडळानी यंदाचा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला . गावात सार्वजनिक ठिकाणी एक ही गणेश मुर्तिची प्रतिष्ठापणा करणार नाही . असा एकमुखी निर्णय या बैठकी वेळी घेण्यात आला . खेबवडे गावच्या या निर्णयाचा इतरही गावांनी आर्दश घ्यावा . असे सरोजनी चव्हाण यांनी सांगीतले . या बैठकी वेळी  गावातील सर्व तरुण मंडळांचे पदाधिकारी  उपस्थित होते .

No comments:

Post a Comment