नंदगाव प्रतिनिधी ः
आपल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यामध्ये आपन आमदार झाल्यावर दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पाच वर्षात पंचवीस हजार झाडे लावणार असल्याचे सांगितले होते.
*जे सांगितले....ते केले याप्रमाणे आपला जाहिरनामा प्रत्यक्ष क्रुतीत उतरविण्यासाठी व वाढत्या प्रदूषण च्या पाश्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षन करण्यासाठी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी जिल्ह्याचे पालक मंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून "सतेज ऋतु" वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले व यासाठी लागणाऱ्या झाडांचा पुरवठा हि त्यांनी आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावात केला. १२ जुलै या दिवशीच हि ५००० झाडे लावण्याचा हा संकल्प होता.याचाच एक भाग म्हणून नंदगाव ता.करवीर येथे गावातील गायरान माळामध्ये व दत्त मंदिरा समोर गावातील ग्रामस्थांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नंदगाव गावच्या सरपंच सौ.छाया मोहन कुंभार ,शाहू साखर कारखाण्याचे संचालक मारूती निगवे, ,ग्राम.पंचायत सदस्य मोहन कुंभार , विजय नलवडे,सामाजिक कार्यकर्ते शाबाजी कुराडे, जयवंत नरके,अंकुश झांबरे,संजय पाटील,प्रकाश सावंत, रवींद्र चौगले, युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सनी नरके, भगवान नरके,बाळासो चौगले ,महिपती पाटील, सिकंदर मुजावर,तुकाराम रेडेकर,
तसेच गावातील युवक, जेष्ठ नागरीक, उपस्थित होते
No comments:
Post a Comment