Monday, 6 July 2020

नामदार बच्चू कडू (राज्यमंत्री म.शा.) सामान्य कार्यकर्त्यांच्या दु :खावर फुंकर घालतात तेव्हा.....


 प्रतिनिधी: प्रमोद झिले  हिंगणघाट  
   महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू हे आपल्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक दुःखावर मायेची फुंकर घालण्यासाठी आपले व्यस्त कार्यक्रम दूर ठेऊन,अंगावरच्या मंत्रिपदाची झुल बाजूला काढून ठेवीत सहजतेने अचानक त्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट देतात आणि पाठीवर हात ठेवून लढण्याची प्रेरणा देतात.
     येथील रुग्णमित्र म्हणून परिचित असलेले श्री गजूभाऊ कुबडे यांच्या पत्नीने  एका गोंडस बाळाला जन्म दिला.पण जन्मताच त्या बाळाला वैद्यकीय समस्या निर्माण झाली.डॉक्टरांच्या अथक परिश्रमा नंतर त्या बाळाने 7 व्या दिवशी या जगाचा निरोप घेतला.
    या दुःखद घटनेची माहिती काही कार्यकर्त्यांकडून ना.कडू यांना कळली.यानंतर 30 जूनला  ना कडू हे अचानक पणे गजुभाऊ कुबडे  यांच्या निवासस्थानी आले.मंत्र्यांच्या मागेपुढे असणारा फौजफाटा व सारा प्रोटोकाल बाजूला सारीत ते सहजपणे गजुभाऊ यांच्या घरी विसावले.सुख दुःखाचा गोष्टी करीत कार्यकर्त्याला हिंम्मत देत साधेपणाने आले....बसले...आणि ....आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवत लढण्याचा मंत्र देत निघूनही गेले. 
  त्यांच्या या साधेपणाच्या वागणुकीने गजुभाऊ कुबडे यांचा परिवारच नाही तर आजूबाजूचेही चकित झाले आजच्या युगात एखादा मंत्री असाही असतो.

No comments:

Post a Comment