नंदुरबार - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर )
नंदुरबार नगर पालिकेच्या माध्यमातून नंदनगरी तील कोणत्याही वार्डातील नागरीक असो, त्याच्या कामासाठी अडचण आल्यास नंदनगरीतील कोणीही मनुष्य थेट आमदार चंद्रकांत रघुवंशींशी संपर्क साधतो, याचा मला अभिमान आहे. यापुढेही आपल्या परिसरात कोणतेही विकासकाम आम्हाला सांगा, त्यासाठी आम्ही आपले बांधील आहोत. आपल्या परिसरातील कोणत्याही विकासकामासाठी अडचण येवू देणार नाही, असे आश्वासन जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले. ह्या प्रसंगी नंदुरबार नगर पालिकेचे बाधकाम सभापती दिपक दिघे तसेच माजी नगरअध्यक्ष , विद्यमान नगरसेवक कुणाल वसावे उपस्थित होते. नंदुरबार येथील गौतम नगर परिसरात नगर पालिकातर्फे सामाजिक सभागृह व रास्ता कॉंक्रीटीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
येथील गौतम नगर परिसरात नगर पालिकातर्फे सामाजिक सभागृह व रास्ता कॉंक्रीटीकरण कामाचे उद्घाटन जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न.पा.बांधकाम सभापती दीपक दिघे, नगर सेवक कुणाल वसावे, नगर सेविका सोनिया, भीम आर्मीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष संजु रगडे तसेच गौतम नगर परिसराचे नागरीक उपस्थित होते. यावेळी भीमआर्मीचे जिल्हाध्यक्ष संजु रगडे म्हणाले की, आ.चंद्रकांत रघुवंशींनी गौतम नगर परिसराला भव्यदिव्य प्रवेशद्वार बांधून दिले. जीमसाठी पाच लाखाचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. या जीममध्ये गौतमनगरसह रेल्वे कॉलनी, कंजरवाडा परिसरातील युवक विनाशुल्क मोठ्या संख्येने व्यायाम करतात. तसेच सभागृहाचे व रस्ता कॉंक्रीटीकरण कामाला मंजुरी दिल्याबद्दल आ.चंद्रकांत रघुवंशी व बांधकाम सभापती दिपक दिघे यांच्यासह नगरपालिकेचे संजुभाऊ रगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येकाकडून तोंडाला मास्क वापरुन सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भीम आर्मीचे रवी रगडे, मोगेश भालेराव, शशी खरताडे, प्रमोद कांबळे, रुपेश कांबळे, मुन्ना एलमार, लोटन पेंढारकर, विलास फुलपगारे, प्रकाश फणसे, अरुण फणसे, रोहित भालेराव, रोनीत भालेराव, कृष्णा भालेराव, एजाज शेख, सोहेब शेख, आकाश व्यास, प्रथम पगारे, रोहित पगारे, रईस पिंजारी पदाधिकारी कार्यकर्त्यांने परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment