Monday, 13 July 2020

सौ. शुभांगी डोंगळे यांची काली रमण फाऊंडेशनच्या कोल्हापूर सचिव पदी निवड -


सिद्धनेर्ली प्रतिनिधी - 

राष्ट्रीय स्तरावर सामाजिक, कला, क्रीडा,कृषी,सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या दिल्लीच्या काली रमण फाऊंडेशनच्या जिल्ह्या सचिवपदी सौ.शुभांगी उत्तम डोंगळे यांची निवड करण्यात आली. 
            समाजातील गरजू लोकांना मार्गदर्शन, मदत आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी  ही संस्था कार्य करत असून  संस्थेची व्यापकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या सचिवपदी सौ. डोंगळे यांची निवड करण्यात आली. त्यांनी विद्यापीठ,राज्यस्तरीय, महापौर कुस्ती चषक पुणे,तसेच ज्युदो या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवले आहे.या निवडीसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै.भरत शिंदे व जिल्हाध्यक्ष पै. कुलदीप खोत तसेच संस्थापक अध्यक्ष पै सुरेंद्रर कालीरमन दिल्ली(अॅडव्होकेट), सचिव नीरज चावला (हरियाणा) यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment