Sunday, 12 July 2020

दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने अनोखे आंदोलन

सैनिक टाकळी 
काळम्मावाडी धरणासाठी आमच्या जमिनी विस्थापिताना देऊ केल्या आहेत .त्यामुळे आमचे हक्काचे पाणी आम्ही येथून उचलू देणार नसल्याचे ठाम मत शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंह घोरपडे यांनी दत्तवाड येथे केले. दूधगंगा  बचाव कृती समिती च्या वतीने दुधगंगा नदीत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी घोरपडे म्हणाले  दुधगंगा नदीवरील दानवाड ,दतवाड हे शेवटचे गाव असल्याने या ठिकाणी बारमाही पाणी मिळावे यासाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी धरणग्रस्तांना दिलेल्या आहेत . येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या ठिकाणी बारमाही पाणी असणे गरजेचे आहे .काही राजकीय पुढारी इचलकरंजी शहरासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दूधगंगा नदीवरून योजना अमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत याला आमचा विरोध राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
इचलकरंजी शहरासाठी कृष्णा नदीवरील पाणी योजना पूर्ण कार्यक्षमतेने चालवावी व या शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा . याच बरोबर या शहरातून वाहणारी पंचगंगा नदी  शुद्धीकरणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरून पाणी शुद्धीकरण करुन या  पाण्याचा देखील वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   
यावेळी   सुरज माने, संतोष पलस्कर, गोटू सुरवंशी, निखिल भाटले, आकाश जाधव ,शुभम कटार, सौरभ जाधव, बाबू वसवडे ,संतोष पाटील, सचिन खरपी ,गौरव जाधव ,साईराम कटार हे उपस्थित होते सुरज माने गोटु सुर्यवंशी, निखिल भटाले अक्षय जाधव, संतोष पलसकर, सौरभ जाधव, बाबु वडगावे,बंडू पाटील, सचिन खरपी,गौरव जाधव.उपस्थित होते.

No comments:

Post a Comment