Sunday, 5 July 2020

पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडले...

प्रतिनिधी सतिश लोहार
*.*

आळतें गावातील राजेश अशोक पांडव हे एका  कंपनीमध्ये मजदुरीचे  काम करतात. व फावल्या वेळेत आठवडी  बाजारात आपला परंपरागत (चांभार ) व्यवसाय   करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यांना हातकणंगले ATM जवळ १०,००० रुपये सापडले. तेंव्हा या व्यक्तींनी ती रक्कम SBI बँकेमध्ये नेऊन तेथील अधिकार्यांकडे सुपुर्त केली. बँक अधिकारी यांच्याकडुन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी  एक कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडली. तुटपुंजा पगार असताना देखील या व्यक्तीने रक्कमेचा दुरूपयोग न करता ती रक्कम हातकणंगले स्टेट बँक मध्ये परत केली व माणुसकिचे दर्शन घडवले , त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल ,  माणुसकीबदल त्यांचे हातकणंगले तालुक्यातुन कौतुक होत आहे . त्यांचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे .

No comments:

Post a Comment