पट्टणकोडोली (साईनाथ आवटे) ता.५ :
-कोरोना पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणीत) शाखा पट्टणकोडोली यांच्या वतीने सोशल डिस्टंसिंग व सर्व नियमाचे पालन करीत गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.यामध्ये तब्बल ८१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.यामध्ये गावातील तरुणांच्या सह महिलांनी हि उत्साहाने रक्तदान केले.
पट्टणकोडोली येथील या सेवा केंद्राच्या वतीने आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबरच मानवी जीवनातील समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आयोजीत केला जातो.यामुळे गावात सेवेकर्यांची संख्या हि अधिक आहे.यातूनच सामाजिक कार्य करता यावे यासाठी केंद्रांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गावातील सर्व डाँक्टरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने रक्तदानास सुरवात करण्यात आली.प्रत्येक रक्तदात्याला मास्क देवुन व सँनिटायझ करुनच रक्तदानास आत घेण्यात आले.रक्तदानानंतर झाडे देवुन रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.केंद्राच्या सेवेकर्यांबरोबरच गावातील अनेक प्रतिष्ठीतांनी रक्तदान केले सदरचे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी केंद्राच्या सर्व भाविक भक्तांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment