Tuesday, 7 July 2020

पट्टणकोडोली मॉर्निंग गृपच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

पट्टणकोडोली(साईनाथ आवटे) 
     पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या नुतन उपसरपंच पदी मा.श्री.कृष्णाजी मसुरकर यांची बिनविरोध निवड झाली.तसेच  हातकणंगले तहसील कार्यालयात दुय्यम निबंधक पदी मा.श्री .राजेंद्र भानसे यांनी पदभार स्वीकारला.याबद्दल पट्टणकोडोली येथील एमआयडीसी रोड मॉर्निंग गृपच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत व प्रास्ताविक गृपचे जेष्ठ सदस्य श्री.आण्णासो आवटे गुरुजी यांनी केले. मा.कृष्णाजी मसुरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर मा.भानसे सरांचा सरकार गृपचे दुसरे जेष्ट सदस्य श्री.नारायण बाळाई यांचे शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी मा.सिद्राम भाणसे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी प्रल्हाद भालबर यांनी आभार मानले. यावेळी  प्रशांत निकम, प्रकाश लडे, सचिन कोळी,बाबासो हुजरे,मदन नरुटे, भरत लडे, विलास कदम आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment