प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त 33 टक्के क्षमतेसह लॉज सुरू करण्यास परवानगी
जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
कोल्हापूर, जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रा व्यतिरिक्त निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स आणि इतर अदरातिथ्य सेवा देणारे लॉज, गेस्ट हाऊस 33 टक्के क्षमतेसह उद्या दिनांक 8 जुलै पासून अटी व शर्तींना अधिन राहून सुरु करण्यास परवानगी देण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिला.
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य आदेशामध्ये निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स आणि इतर अदरातिथ्य सेवा देणारे लॉज, गेस्ट हाऊस 33% क्षमतेसह प्रतिबंधीत क्षेत्रा व्यतिरिक्त दिनांक 08/07/2020 पासून सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे.
निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स आणि इतर आदरातिथ्य सेवा देणारे लॉज, गेस्ट हाऊस इत्यादींसाठी आवश्यक अटी व सेवा शर्ती वर मान्यता देण्यात आली आहे.
हॉटेल बाहेरील आवारात जसे की पार्किंग व इतर मोकळ्या जागा यामध्ये गर्दी होणार नाही यासाठी योग्यती व्यवस्था करावी.
हॉटेल प्रवेशव्दारामध्ये थर्मल स्क्रीनिंगची तरतूद करणे. स्वागत कक्ष / ठिकाणी संरक्षक काच बसविणे आवश्यक आहे. अतिथींसाठी पेडल ऑपरेट डिस्पेंसर हँड सॅनिटायझर्स / ऑटोमॅटीक सेन्सर असलेले डिस्पेंसर हँड सॅनिटायझर्स स्वागत कक्ष, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी , पार्कीग इत्यादी) विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत. चेहरा झाकणारे कव्हर / मास्क, ग्लोव्ह्ज इ. योग्य वैयक्तिक संरक्षणासाठी निर्धारित केलेली साधने, आस्थापनेव्दारे अतिथींना व कर्मचारी यांना उपलब्ध करुन द्यावीत. संपर्क टाळण्यासाठी हॉटेल चेक-इन, चेक-आउट आणि इतर सर्व सुविधांसाठी क्यूआर कोड, ऑनलाइन फॉर्म, डिजिटल पेमेंट्स, इ-वॉलेट इत्यादी सारख्या प्रणालींचा वापर करावा. सामाजिक अंतराचे योग्य निकष पाळण्यासाठी लिफ्टमधील अतिथींची संख्या मर्यादित ठेवावी.
कोणतीही कोरोना सदृष्य आजराची लक्षणे नसलेल्या अतिथींनाच प्रवेश देणे बंधनकारक असेल. हॉटेल मध्ये केवळ चेहरा कव्हर / मास्क वापरत असलेल्या अतिथींना प्रवेश देणे. तसेच वरील सर्व ठिकाणी चेहरा कव्हर / मास्क नेहमीच परिधान करणे हे सक्तीचे आहे.
No comments:
Post a Comment