Thursday, 2 July 2020

ग्रामपंचायतीनी शाश्वत स्वच्छतेसाठी गावपातळीवर गुडमॉर्निंग पथक राबवावे- जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

**

उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे 

लातूर जिल्हा  हागणदारीमुक्त झाला असला तरी घरात शौचालय असताना देखील अनेकजण उघड्यावर शौचास जात असुन हे थांबविण्यासाठी व कोरोनाला दुर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतनी गावपातळीवर गुडमॉर्निंग पथक राबवावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी उपाध्यक्ष भारतबाई साळुंके,कृषी सभापती गोविंद चिलकुरे, आरोग्य सभापती संगीताताई घुले,समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,महीला बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपमुख्य कार्यकारी पाणी व स्वच्छता अधिकारी किशोर काळे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की जिल्ह्यातील ग्रामपंचायती मध्ये कामाच्या बाबतीत तक्रारी असतील तर आपण थेट जिल्हा परिषद ला करावी जेणेकरून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसेच गावपातळीवर स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छ भारत मिशन ने जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने नेहमीच चांगले काम केले असून त्यामुळे आपला जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे मात्र आज ही अनेक लोकांकडे शौचालय असताना देखील उघड्यावर जात आहेत.कोरोनाच्या महामारीत आपण मात करण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये गुड मॉर्निंग पथक गठीत करण्यात आले असून त्याची गावपातळीवर मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी व्हावी व उघड्यावर जाणारे लोक यांच्यावर कारवाई करावी जेणेकरून घाण होणार नाही.तसेच
लोटाबहाद्दरांविरूद्ध दंडात्मक कारवाई करावी.काही ठिकाणी शौचालय बांधकाम झाल्यानंतरही नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याची बाब निदर्शनात आली आहे त्यामुळे शाश्वत स्वच्छतेसाठी सर्व सरपंचांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रे यांनी केले.तसेच सामुहिक शौचालय, घनकचरा सांडपाणी,तसेच नाविन्यपूर्ण कामाच्या दृष्टीने काही राबविण्यासाठी मार्गदर्शनासाठी पंचायत समिती व  जिल्हा परिषदला संपर्क साधावा  जेणे करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येईल असे ही ते म्हणाले.गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गावातील प्रत्येकाने वैयक्तिक शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे हाच खरा शाश्वत स्वच्छतेचा मार्ग आहे.तरी आपण सर्वांनी गावांसाठी मीच माझा रक्षक बनुन काम करत रहावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment