कोल्हापूर / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रदुर्भाव लक्षात घेता व तसेच केंद्र शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे शासनाचे वर्ग सुरु करण्याबाबत सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय विद्याभवन, शिवाजी पार्क, कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते.
यावेळी शासनाच्या १५ जून व २४ जून रोजीच्या निर्णयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या शासन निर्णयात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबतचा उल्लेख केलेला आहे. शाळा सुरु करण्याबाबत शाळा समित्यांच्या बैठकीत मंजूरी घेऊन स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी असे सूचित केले आहे. त्यानंतर २४ जून रोजीच्या शासन निर्णयात शिक्षकांच्या उपस्थितीबाबतचा उल्लेख केला आहे. त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.
या दोन्ही शासन आदेशामुळे शाळा सुरु करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच केंद्र शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविला आहे. यामध्ये शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय नाही. शाळा सुरु करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश नसताना मुख्याध्यापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर शाळा सुरु करणे अडचणीचे आहे. याबाबत जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत एकवाक्यता येण्यासाठी शासनाचे सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, शिक्षक नेते दादा लाड, संस्थाचालक संघाचे सचिव प्रा.जयंत आसगावकर, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, शिवाजी माळकर, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, शिवाजी कोरवी, प्रा.सी.एम.गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे लोकल ऑडीटर मिलिंद पांगिरेकर, ट्रेझरर नंदकुमार गाडेकर, संपर्क प्रमुख अशोक हुबळे, संचालक रवींद्र मोरे, अजित रणदिवे, श्रीकांत पाटील, जितेंद्र म्हैशाळे, सागर चुडाप्पा, प्रकाश पोवार, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, संदीप पाटील, गजानन काटकर, अशोक पाटील, के.जी.पाटील, बसवराज वस्त्रद, एच.जी.सुतार, मनोहर जाधव, पी.एस.जगताप, राजेश कोंडेकर, अनिल सरक, राजेंद्र कोरे, एम.जे.पाटील आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
: कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि केंद्र शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे शासनाचे सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- एस.डी.लाड, सभाध्यक्ष, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ
: शासनाच्या १५ जून व २४ जून या दोन्ही परिपत्रमुळे शाळा सुरु करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचे स्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
- सुरेश संकपाळ, चेअरमन, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ
: शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचे स्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांनी कार्यवाही करावी.
- भरत रसाळे, राज्याध्यक्ष, खाजगी प्राथमिक शिक्षक समिती.
फोटो
मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ बोलतांना शेजारी सचिव दत्ता पाटील एस डी लाड दादा लाड प्रा. जयंत आसगावकर भरत रसाळे
No comments:
Post a Comment