कोल्हापूर, दि. 9 :
शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यासोबतच आपला परिसर तंबाखू मुक्त करण्यासाठी स्वयंशिस्तीने प्रतिबंध करावा. त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकने व धुम्रपान करुन उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण बैठक आज झाली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, तंबाखू जन्य पदार्थाच्या सेवनास, धुंकण्यास व धम्रपानास प्रतिबंध करण्याबाबतच्या 29 मे 2020 रोजीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. केवळ कागदावर तंबाखू मुक्त शाळा आणि परिसर करण्यापेक्षा अंमलबजावणीवर अधिक भर द्यावा. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी द्या तंबाखू व ई सिगारेटला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार, असे सांगत तंबाखू मुक्तीची शपथही घेण्यात आली.
याबैठकीला जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर, वकील मिलींद कुऱ्हाडे, सहायक काय्रक्रम अधिकारी शशिकांत कदम, उप शिक्षणाधिकारी विजय ओतारी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment