Friday, 10 July 2020

मास्क नाही , १०० रु .ची पावती फाडा ...

कंदलगाव ता .१० , 
      शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण वाढत असून नागरीकातून सोशेल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करणे टाळण्यात येत आहे . आशा कारणाने कोरोना बाधितांची संख्या वाढत असून प्रवाशी व नागरीकांतून सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने कोल्हापूर महापालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहिम राबवत शहराच्या सर्वच मुख्य रस्त्यावर मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे .
     आर .के. नगर , सुभाष नगर तसेच यल्लमा मंदिर चौक येथे मास्क न वापरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला .
     या कारवाईत नेहरूनगर व शास्त्रीनगर येथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता .

फोटो - कंदलगाव - मास्क न वापरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करताना महापालिकेची कोवीड १९ ची टीम .

( छायाचित्र _ प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment