कंदलगाव ता .१० ,
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गावामध्ये गर्दि होऊ नये तसेच कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी कंदलगाव ग्रामपंचायत व गो . शिरगाव पो . ठाण्याकडून गावातील सर्व तरून मंडळांना गावामध्ये गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आवाहन केले होते .
त्या अनुषघाने येथील आंबाबाई मंदिरात झालेल्या बैठकीत गावात एकच सार्वजनिक गणपती बसवून गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे एकमताने ठरविण्यात आले .
या बैठकीला गावचे सरपंच , उपसरपंच , सर्व सदस्य , गो . शिरगाव पो .ठाण्याचे स.पो.नि. सुशांत चव्हाण यांचे सह गावातील एकून सातरा मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तसेच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
No comments:
Post a Comment