एस एम वाघमोडे
गांधीनगर प्रतिनिधी
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे वाढत्या डेंगू संशयित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गडमुडशिंगी तील अति जोखमीच्या भागांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली तसेच डेंगू चा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपायांचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच डेंगू आजाराच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व साहित्यांचा व औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन ही यावेळी दिले. डेंगू चा प्रसार रोखण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर गावातील तलावांमध्ये व इतर जल स्तोत्रांमधे डेंगू चा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे तलावात सोडण्यात आले.
यावेळी गडमुडशिंगी गावचे सरपंच जितेंद्र यशवंत यांनी जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गावास भेट भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला. यावेळी राज्य ताप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामसेवक आर. एन. गाढवे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर आर. एम मुल्ला, आरोग्य सहाय्यक एन. वाय. लोहार, माजी सरपंच पांडुरंग कांबळे, कृष्णात रेवडे, गितेश डकरे, आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
डेंगू चा प्रसार रोखण्यासाठी डबके घरातील बॅरेल टायर करवंट्या कुंड्या फ्रीज मागील कंटेनर इत्यादी पाणी साठवून राहणारी साधने स्वच्छ करणे आवश्यक असून आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाणी साठवण्याची साधनेही कोरडी करून आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे आवश्यक अाहे
विनोद मोरे
जिल्हा हिवताप अधिकारी
No comments:
Post a Comment