Saturday, 4 July 2020

कृषी विभागातर्फे टोळधाड जनजागृती व मार्गदर्शन


प्रतिनिधी:- प्रमोद झिले हिंगणघाट, वर्धा   
       -हिंगणघाट तालुक्यातील येरला येथे कृषी सप्ताहाअन्तर्गत टोळधाड जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी कृषी सहायक शेन्द्रे मैडम यानी टोळधाड नियंत्रण व त्यावरील उपाययोजना कशा प्रकारे करता येईल हे शेतकर्याना समजावून सांगितले तसेच पिक पिक उत्पादनावर परिणाम न होवू देता कमी खर्चात शास्वत शेती कशी करता येईल व फळबाग लागवड, कीटकनाशके खरेदी करताना काय काळजी घ्यावी व वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.कोरोना संदर्भात आपण काळजी घ्यावी व नियमाचे पालन करुन जनजागृती करण्यात आली.यावेळी गावातील अनिल घुंगरड, रितेश वानखेडे,रज्जत झुन्गरे, पत्रकार प्रमोद झिले, दिनेश ठाकरे, गणेश पावडे, कुणाल झिले, राजू वाघमारे, संजय वाघमारे उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment