नंदुरबार - प्रतिनिधी - वैभव करवंदकर
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पालिकेतर्फे शहरात फवारणीसाठी दोन अध्यायवत फवारणी मशीन घेण्यात आले . या मशीनच्या शुभारंभ माजी आ चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
नंदुरबार पालिकेतर्फे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक असे दोन फवारणी मशीन घेण्यात आले . त्या मशीनचा शुभारंभ माजी आ. चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अँड. राम रघुवंशी ,प्रीतम ढंडोरे, विशाल कांबळे, भारत भूषण, रवी काटे हे उपस्थित होते.
पालिके तर्फे मागविण्यात आलेल्या दोन मशीन पैकी एक इटली तर दुसरे भारतीय बनावटीचे आधुनिक मशीन आहे. दोन्ही मशीन पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे आहे. त्यात एक साडेतीन लाख रुपये तर दुसरे एक लाख 75 हजार रुपये किमतीचे आहे. या मशिनद्वारे कमी वेळात जास्त फवारणी होते. फवारणीसाठी टाकीची क्षमता मोठी आहे. संपूर्ण शहरात या मशिनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment