कंदलगाव ता.२१,
शहरासह ग्रामिण कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भितीचे वातावरण पसरू लागल्याने आशा रुग्णांची संख्या कमी करणेसाठी लॉक डाऊन शिवाय पर्याय नसल्याने प्रशासनाने दि.२०ते दि.२६जुलै पर्यत जिल्ह्यात लॉक डाऊन केले आहे.
कोल्हापूर दक्षिण विभागातील पाचगाव, कंदलगाव,मोरेवाडीसह आर.के. नगर परिसरातील व्यापारी, व्यवसाईकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून लॉक डाऊनला मोठा प्रतिसाद दिला.
या पाश्र्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन परिसरात जनजागृती केली असून लॉक डाऊन पार पाडणेसाठी सहकार्य करणेची दवंडी देण्यात आली आहे.
पाचगावच्या संदिपची अभिनव जनजागृती ..
पाचगाव येथील फायटर नावाने ओळखला जाणारा दुचाकी मिस्त्री म्हणून व्यवसाय करणारा संदिप गायकवाड गेल्या चार महिन्यापासून आपला व्यवसाय सांभाळून कोरोना योद्धा म्हणून परिसरातील नागरीकांची चोवीस तास जनजागृती करीत आहे.आपल्या बाईकचा सायरन वाजवून नागरीकांना मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टनिंग यासारखी जनजागृती करीत आहे .
फोटो - आर.के. नगरमध्ये लॉक डाऊन काळात कडकडीत बंद पाळण्यात आला .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment