Tuesday, 21 July 2020

कंदलगाव येथील चंद्राईनगरमध्ये सांडपाण्याचा प्रश्न गंभीर .. दलदलीमुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती.

कंदलगाव ता.२१,
    चंद्राईनगर परिसरात गेल्या पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत असून परिसरात एकाही गल्लीत गटारीची सोय नसल्याने वाढत्या रहिवाशी कॉलण्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे .
    बेळगावकर कॉलणी, बाबर कॉलनी व चंद्राईनगर या तीन कॉलण्यांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने परिसरात डासांची उत्पत्ती वाढल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे .नागरीकांचे आरोग्य बिघडण्याआधी ग्रामपंचायतने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
कोट- पुर्वीचा नाला खाजगी मालकाच्या हद्दीतून असल्याने गटारीचे पाणी सोडण्यास विरोध केला जात आहे.गटारीमंजूर आहेत.पण तांत्रीक आडचणीने थांबल्या आहेत.

फोटो . चंद्राई नगरमध्ये गटारी नसल्याने रस्त्यावर झालेली दलदल .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment