कंदलगाव ता.२१,
सध्या सगळीकडे कोरोना विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे गणेश उत्सवात गर्दिचे वातावरण होऊ नये. यासाठी अनेक गावात एक गाव एक गणपती संकल्पन सध्या सुरू आहे. मात्र पाचगावात ही संकल्पना आमंलात आली नाही
पाचगावची लोकसंख्या मोठी असण्याबरोबर सार्वजनिक मंडळे देखील भरपूर प्रमाणात आहेत. मुळ गावातच तीन तालीम मंडळाबरोबर अंदाजे १० तरुण मंडळे आहेत. ही संख्या केवळ मुळ गावातील मंडळाची आहे पंचेचाळीस उपनगरे आहेत या प्रत्येक उपनगरात अनेक मंडळे गणपतीची प्रतिष्ठापना करीत असतात ही प्रथा कशी मोडायची यामुळे येथे एक गाव एक गणपती संकल्पना आंमलात येण्यास खूप अडचणी आहेत.
ग्रामपचायतीने एक गाव एक गणपती करीता सभेचे आयोजन केले पण ; त्याला कोणत्याही मंडळाने प्रतिसाद दिला नाही.
तरी प्रशासनाचे सर्व नियम पाळून गणपती बसवण्यात यावे असे आवाहन ग्रामपंचायत कडून सरपंच संग्राम पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment