हेरले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर
दि.21/7/20
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या राज्य दूध संकलन बंद आंदोलनास हेरले ( ता.हातकणंगले) येथील सर्व दूध संस्थांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणिस मुनिर जमादार यांनी केले.
हेरले गावातील कामधेनू दूध संस्था, दुधगंगा दूध संकलन केंद्र, कामधेनू वडगाव दूध संकलन केंद्र,कोरेगावे दूधसंकलन केंद्र,लाड दूध संकलन केंद्र या सर्व दूध संस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंद आंदोलनाला पाठिंबा दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणिस मुनिर जमादार म्हणाले आज पवित्र श्रावण महिन्याच्या सुरवातीला शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक दिवसाचे लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्याचे आवाहन केले , त्याला सर्व दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संकलन करणाऱ्या संस्था आणि केंद्रे यांनी दूध संकलन बंद करून उत्स्फुर्त पणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बंद ला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद ,आणि आभार , आमच्या केंद्र शासनाने जी २३जून ला दूध पावडर दहा हजार टन आयात करण्याचा निर्णय घेतला तो त्वरित रद्द करावा , तूप ,बटर, इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी रद्द करावी , आणि पाण्यापेक्षा ही सध्या जो दुधाला दर आहे तो वाढवून मिळावा , लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेला दूध उत्पादकला ५ रुपये थेट अनुदान त्याच्या खात्यावर जमा करावे अशी आग्रही मागणी आमची आहे , तोट्यात चाललेला दुग्ध व्यवसायाला उभारी द्यावी हीच आमची मागणी आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेर- निगा जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संकलन बंद आंदोलन शांततेत पार पडले.
No comments:
Post a Comment