प्रतिनिधी: प्रमोद झिले हिंगणघाट
येरला:- वरुण राजाने मृग नक्षत्रात हजेरी लावल्याने शेतकर्याने शेतात महागडे बियाणे घेवून कपाशी,तूर, सोयाबीण पिकांची पेरणी केली. मध्येच पावसाने दगा दिला,दुबार पेरणीचे संकट आले तरीही न डगमगता वरुण राजाला नमन करुन दुबार पेरणी केली बहुतांश शेतकर्याच्या शेतात सोयाबीन उगवलच नाही.आपल्याला मागच्या वर्षीपेक्षा जास्त उत्पन्न होईल या आशेने बियाणे पेरले परंतू बियाण्याला अंकुर येत नाही तोच वन्यप्राणी शेतात हैदोस घालताना दिसत आहे.रोहि, डुक्कर, वानर, हरीण, हे वन्यप्राणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करताना दिसत आहे.शेतकरी रात्रंदिवस जीव धोक्यात घालुन पिकांची रखवाली करत आहे.या सर्व प्रकाराकडे वनविभाग कशाला त्रास घ्यायचा असे म्हणून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे. वनविभागाने वन्यप्रान्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोहणा, येरला, सास्ती-हडस्ती, धोच्ची,वेणी या परिसरातील शेतकरी करीत आहे.
No comments:
Post a Comment