कंदलगाव ता. १५ ,
अवजड वाहनांची दिवस रात्र वर्दळ आणि वाढत्या वाहतूकीमुळे चित्रनगरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवाशी व नागरीकांची कसरत होत आहे.
गेल्या दिड वर्षापासून सुरू असलेल्या आरटीओ सर्कलमुळे या रस्त्यावर वाहतूकीचा ताण पडत असून या ठिकाणी तपासणीसाठी येणारी अवजड वाहने प्रामुख्याने याच रस्त्याचा उपयोग करतात . संबंधीत विभागास या रस्त्याची डागडूजी व्हावी यासाठी अनेकदा कल्पना दिल्या आहेत.मात्र या कामी दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरील खड्डयामुळे आरोग्य समस्या वाढल्या आहेत.
सध्या कोरोनामुळे शाळा,कॉलेज बंद असले तरी एम.आय.डि.सी.व महामार्गावर जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे .
या रस्त्यावरून सध्या वाहतूक वाढली असून रस्त्यावरील खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . खड्डयामुळे वाहतूक धोकादायक बनत आहे .
अनिल सुतार , उपाध्यक्ष समाजवेध दक्षता समिती , कंदलगाव
फोटो - चित्रनगरी रस्त्यावर पडलेले खड्डे .
( छायाचित्र . प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment