Friday, 17 July 2020

वाढत्या रुग्णांमुळे गावागावात भितीचे वातावरण...मास्क लावला,पण सोशेल डिस्टन्सींगचे काय ?

 कंदलगाव - प्रकाश पाटील,
      लॉक डाऊनमध्ये शिथिलता करून प्रशासनाने दुकानांची वेळ वाढविल्याने कोरोनाचाही प्रादुर्भाव कमी झाल्याचे गृहित धरून पहिल्या पेक्षा जास्त गर्दि वाढत असल्याने शहरासह गावागावात रुग्णांमध्ये भर पडत असल्याने भिती वाढत आहे.
    ९ ते ५ या वेळेत नोकरदारांना संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यावर मर्यादा येत असल्याने प्रशासनाने दुकानचीवेळ दोनतास
 वाढवून दिल्याने पुर्वीपेक्षा जास्त गर्दि होत आहे.आशावेळी सोशल डिस्टन्सींगचा विसर पडल्याने रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याचे सध्या स्थितीवरून लक्षात येत आहे .
     शहरालगत असणाऱ्या उपनगरात, खेड्यात स्थानिकांची घालमेल वाढून भितीचे वातावरण पसरत आहे. दक्षिण विभागातील पाचगाव, आर.के.नगर, मोरेवाडी असो वा गो.शिरगाव, उंचगाव, उजळाईवाडी या गावातील कोरोना बाधितांमुळे नागरीकांची घालमेल वाढली असून जिथे रुग्ण सापडतो तो प्रभाग, नगर लॉक डाऊन होत आहे. वाढत्या रुग्णांमुळे मात्र भिती कायम आहे.
    स्थानिक प्रशासन अंगणवाडी, आशा कर्मचारी तसेच आरोग्य यंत्रणा सक्रिय असल्या तरी बाहेरून गावात येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांवर लक्ष ठेवणेसाठी यंत्रणेची दमछाक होत आहे . गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिवर नजर असली तरी येणाऱ्या व्यक्ति कडून भावनिक कारण सांगून वेळ मारून नेण्याचे प्रकार घडत आहेत.
चौकट- रूग्ण कमी करणेसाठी दंडाचा फार्मूला...
    महापालिकेच्या पाश्र्वभूमीवर गावात सुद्धा विना मास्क, सोशल डिस्टन्सींगचा गैरवापर करणाऱ्यांवर ग्रामपंचायत तसेच कोरोना कमिटीद्वारे दंडात्मक कारवाई सुरू आहे .


अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यामार्फत १४ गावांमध्ये प्रत्येक घरोघरी जनजागृती पत्रिका पोचविल्या आहेत. तसेच रोजच्या सर्वेतून स्वच्छता, मास्क लावणे, गर्दिची ठिकाणे टाळणे, अंतराचे पालण करणे आशा सुचना दिल्या आहेत .

बी.एस.मस्के ,आरोग्य अधिकारी कणेरी .

No comments:

Post a Comment